सरकारी नोकरी शोधताय? भारतीय रेल्वे मंत्रालय व रेल्वे भरती मंडळ (RRB) यांच्या मार्फत टेक्निकल आणि नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या भरती अंतर्गत एकूण 08868 पदे भरण्यात येणार असून, इच्छुक व पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली देण्यात आली आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
या भरतीमध्ये प्रवासी व्यवस्थापन, स्टेशन प्रशासन, तिकीट व्यवहार, लिपिकीय कामकाज आणि रेल्वे ऑपरेशन्सशी संबंधित अनेक पदांचा समावेश आहे. स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेन मॅनेजर, चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर, सिनियर क्लर्क कम टायपिस्ट, ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट, कमर्शियल कम तिकीट क्लर्क, अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट तसेच ट्रेन्स क्लर्क अशा पदांवर नियुक्ती केली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता पदानुसार 12वी उत्तीर्ण किंवा पदवीधर असू शकते. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF मधील पात्रतेची माहिती नीट तपासावी. उमेदवाराचे वय 18 ते 33 वर्षे या मर्यादेत असणे आवश्यक आहे. भरती प्रक्रिया निवड झालेल्या उमेदवारांसाठी कायमस्वरूपी नोकरी प्रदान करणारी आहे. नियुक्त उमेदवारांची सेवा संपूर्ण भारतातील रेल्वे विभागांमध्ये दिली जाईल. अर्ज भरण्यापूर्वी RRB द्वारे प्रकाशित केलेले CEN नोटिफिकेशन वाचणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
◾अर्ज सादर करण्यासाठी दोन अंतिम तारखा निश्चित आहेत:
1) Graduate प्रवर्ग: 20 नोव्हेंबर 2025
2) Undergraduate प्रवर्ग: 27 नोव्हेंबर 2025
अधिकृत अर्ज लिंक व जाहिरात PDF रेल्वे भरती मंडळाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळीच पूर्ण करावा, कारण अंतिम तारखे नंतर अर्ज स्वीकृत केले जाणार नाहीत.