मोठ्ठी भरती : एकूण 5841 पदांची भरती सुरू! | शैक्षणिक क्षेत्रात नोकरी | आजचं ऑनलाईन अर्ज करा.

तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. नवोदय विद्यालय समिती अंतर्गत तब्बल 5841 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये प्राचार्य, सहाय्यक आयुक्त (शैक्षणिक), पदव्युत्तर शिक्षक (PGTs), पदव्युत्तर शिक्षक (PGTs) आधुनिक भारतीय भाषा, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGTs), प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGTs) तृतीय भाषा, ज्युनियर सचिवालय सहाय्यक (मुख्यालय/RO संवर्ग), ज्युनियर सचिवालय सहाय्यक (JNV संवर्ग), लॅब अटेंडंट, मल्टी टास्किंग स्टाफ (मुख्यालय/RO संवर्ग) ही पदे भरली जात आहेत. PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

Pdf जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

या भरती मध्ये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना दरमहा रु. 18,000/- ते रु. 2,09,200/- पर्यंत मासिक वेतन दिले जाणार आहे. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना संपूर्ण भारत मध्ये कुठेही नियुक्ती दिली जाऊ शकते.

अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने त्याची पात्रता पूर्ण केली पाहिजे. उमेदवारांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पुढील टप्प्यांसाठी परीक्षेसाठी निवडले जाईल. म्हणून, सीबीएसई, केव्हीएस आणि एनव्हीएस द्वारे जाहिरात केलेल्या पात्रता निकषांनुसार त्यांची पात्रता सिद्ध करण्याची जबाबदारी उमेदवाराची असेल. उमेदवाराने त्यांचा ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर (ऑनलाइन अर्ज फॉर्ममध्ये भरलेला) भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कार्यरत आणि वैध ठेवावा. निवडलेल्या उमेदवारांना सुरुवातीला दोन वर्षांच्या कालावधीसाठी परिवीक्षा कालावधी असेल, जो सक्षम अधिकाऱ्यांच्या विवेकबुद्धीनुसार वाढवता येतो. परिवीक्षा कालावधी दरम्यान, परिवीक्षाधीन व्यक्तीची सेवा कोणत्याही वेळी कोणतेही कारण न देता समाप्त केली जाऊ शकते. 04 डिसेंबर 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.

🔔 व्हॉट्सॲपवर नोकरी जाहिरात मिळवा!
जर तुम्ही आमच्या व्हॉट्सॲप ग्रुप मध्ये जॉईन नसाल तर आजचं ग्रुप मध्ये सामील व्हा.
👉 येथे क्लीक करा
बंद करा (Close)