महाराष्ट्र वनविभाग भरती 2025 | पदे : डेटा एंट्री ऑपरेटर व इतर | मासिक वेतन : 18,000 रुपये | PDF जाहिरात येथे.

महाराष्ट्र वनविभाग अंतर्गत नोकरी शोधत असाल तर चांगली संधी आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत एमएस-सीआयटी प्रशिक्षक, एमएसटीआरआयपीईएस डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि माजी सैनिक ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 18,000 रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे. अधिकृत वेबसाईट व जाहिरात खाली देण्यात आली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाइन (ई-मेल) / ऑफलाइन असणार आहे. 03 नोव्हेंबर 2025 ही अर्ज सुरू होण्याची दिनांक आहे. एकूण 13 पदे भरली जात आहेत. उमेदवारांची निवड प्रक्रिया ही मुलाखत द्वारे केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख ही 25 नोव्हेंबर 2025 आहे. वरील पदांसाठी अर्ज करु इच्छिणा-या उमेदवारांनी त्यांची स्वाक्षरी केलेला बायोडाटा (Resume) व पदांकरिता आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे PDF Format मध्ये एकाच फोल्डर मध्ये def.akot@yahoo.com या ईमेल आयडी वर मेल करावे किंवा दिलेल्या पत्त्यावर अंतिम तारीख पर्यंत सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत पोस्ट किंवा स्वहस्ते/दुता मार्फत पोहचवावे.

उमेदवारांनी कागदपत्रे सादर करतांना मोबाईल क्रमांक नमुद करावा; जेणेकरुन, या कार्यालयाव्दारे उमेदवारास आवश्यक सुचना कळविण्यात येईल. सदर कंत्राटी पदाकरिता ईच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता दि.25/11/2025 रोजी सकाळी 11.00 वा. उपवनसंरक्षक, आकोट वन्यजीव विभाग, आकोट यांचे कार्यालय (पत्ता- पोपटखेड रोड, आकोट, जि. अकोला) येथे हजर रहाव. एखादी बाब किंवा अपूर्ण माहिती लक्षात घेता अथवा ईतर कोणत्याही कारणास्तव कारण न दर्शविता उमेदवारास नाकारण्याचा अधिकार निवड समितीने यांनी राखुन ठेवला आहे.

20 नोव्हेंबर 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे. अर्ज सादर करण्याचा पत्ता हा वनसंरक्षक कार्यालय, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अकोट वन्यजीव विभाग, अकोट आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज पाठवण्याचा ई- मेल पत्ता: dcf.akot@yahoo.com या पत्त्यावर पाठवू शकता. मुलाखतीची पत्ता हा वनसंरक्षक कार्यालय, अकोट वन्यजीव विभाग, अकोट (पत्ता- पोपटखेड रोड, अकोट, जि. अकोला) आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत pdf जाहिरात वाचा.

व्हॉट्सअप चॅनेल Follow करा ➤ MN Nokari Logo