महाराष्ट्र शासन नोकरी : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रादेशिक विभाग मध्ये तब्बल 0290 पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध | PDF जाहिरात येथे.

जे उमेदवार महाराष्ट्र शासनची सरकारी नोकरी शोधताय त्यांच्यासाठी चांगली संधी आहे. या भरती मध्ये गट ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ कॅडर या संवर्गातील पदे भरली जात आहेत. या भरती मध्ये लेखापरीक्षण अधिकारी/वरिष्ठ लेखा अधिकारी, लेखा अधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारी, सहाय्यक लेखापाल, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिक), उच्च श्रेणीतील स्टेनोग्राफर, निम्न श्रेणीतील स्टेनोग्राफर, कनिष्ठ लिपिक/लिपिक-टंकलेखक, सहाय्यक स्टोअरकीपर, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

एकूण तब्बल 290 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाल्या आहे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना दरमहा रु. 19,900/- ते रु. 1,77,500/- मासिक वेतन दिले जाणार आहे. तुम्ही पात्र असाल तर 20 नोव्हेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी अर्ज शुल्क हे खुल्या वर्गासाठी: रु. १०००/- आणि राखीव वर्गासाठी: रु. ९००/- असणार आहे. नोंदणी व अर्ज भरण्याची प्रक्रिया उमेदवाराने स्वतः काळजीपुर्वक करणे आवश्यक आहे.

◾काही नियम व अटी :
1) अर्ज मराठी व इंग्रजीमध्ये उपलब्ध करुन देण्यात आला असला, तरी संगणक प्रक्रियेकरिता अर्ज इंग्रजीमध्ये भरणे आवश्यक आहे.
2) महिला उमेदवारांनी त्यांच्या नावात काही बदल असल्यास (लग्नापूर्वीचे नाव, लग्नानंतरचे नाव त्यासंदर्भात आवश्यक कागदपत्रे, विवाह नोंदणी दाखला तसेच कागदपत्रे पडताळणी सादर करणे आवश्यक आहे. तसेच एस.एस.सी. अथवा तत्सम प्रमाणपत्रांवरील नावाप्रमाणे अर्ज भरावेत, त्यानंतर नाव बदलले असल्यास अथवा प्रमाणपत्रातील नावात कोणत्याही प्रकारचा बदल झाला असल्यास, त्यासंबंधीच्या बदलासंदर्भातील राजपत्राची प्रत परीक्षेच्या वेळी तसेच कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करावी.
3) संबंधित पदाच्या/परीक्षेच्या जाहिरात/अधिसूचनेमध्ये दिलेल्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करुनच अर्ज सादर करावा. अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारेच पात्रता आजमावली जाईल व त्याच्या आधारे निवड प्रक्रिया पूर्ण होईल.
4) उमेदवाराने अर्जात स्वतः चे नाव, सामाजिक प्रवर्ग, समांतर आरक्षण, कोणत्या प्रवर्गातून अर्ज करु इच्छित आहे तो प्रवर्ग, जन्मदिनांक, भ्रमणध्वनी क्रमांक व ई-मेल आयडी इत्यादी माहिती काळजीपूर्वक भरावी.
5) भरती प्रक्रियेच्या संदर्भातील सर्व माहिती व त्यानुषंगाने होणाऱ्या बदलाबाबतची सर्व माहिती केवळ www.mjp.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल, याव्यतिरिक्त कोणत्याही माध्यमाव्दारे भरती प्रक्रियेची माहिती उपलब्ध होणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
◾अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 20 नोव्हेंबर 2025.
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 डिसेंबर 2025.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत PDF जाहिरात वाचा.

🔔 व्हॉट्सॲपवर नोकरी जाहिरात मिळवा!
जर तुम्ही आमच्या व्हॉट्सॲप ग्रुप मध्ये जॉईन नसाल तर आजचं ग्रुप मध्ये सामील व्हा.
👉 येथे क्लीक करा
बंद करा (Close)