सरकारी नोकरी शोधताय? डी.व्ही.एम. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये गट ड (वर्ग ४)- शिपाई, माळी, अंधारखोली परिचर ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी 0154 पदे भरली जात आहेत. या भरतीसाठी वयोमर्यादा ही अराखिव (खुला): १८ वर्षे ते ३८ वर्षे, मागासवर्गीय/अनाथ/आ.दु.घ: १८ ते ४३ वर्षे असणे आवश्यक आहे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना १५००० ते ४७६०० मासिक वेतन दिले जाणार आहे. या भरतीसाठी अर्ज शुल्क हा खुला प्रवर्ग: १०००, राखीव प्रवर्ग (मागास प्रवर्ग व आर्थिकदृट्या दुर्बल घटक): ९०० आहे. PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे. पदांसाठी उमेदवाराची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण ही पात्रता असेली पाहिजे. उमेदवाराला मराठीचे ज्ञान (लिहीता वाचता येत) असावे. उमेदवाराने शैक्षणिक पात्रता ही अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिनांका पर्यन्त धारण केलेली असावी. जर उमेदवाराने अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिनांका नंतर शैक्षणिक पात्रता धारण केली असेल तर अशा उमेदवाराला कोणत्याही कारणास्तव परीक्षेसाठी पात्र ठरविले जाणार नाही. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारले जात आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 नोव्हेंबर 2025 आहे. PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.