अग्निशमन विभाग मध्ये नोकरी शोधत असाल तर ही मोठी संधी आहे. अग्निशमन विभाग मध्ये चालक – यंत्रचालक / वाहनचालक (अग्निशमन), फायरमन (अग्निशामक) ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये तब्बल 0186 पदे भरली जात आहेत. शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना दरमहा रु. १९,९००/- ते रु. ६३,२००/- पर्यंत मासिक वेतन दिले जाणार आहे. या भरतीसाठी वयोमर्यादा ही १८ वर्षे ते ३३ वर्षे असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. खुल्या वर्गासाठी: रु. १०००/- आणि राखीव वर्गासाठी: रु. ९००/- अर्ज शुल्क आकारले गेले आहे. अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख ही १० नोव्हेंबर २०२५ तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही ०१ डिसेंबर २०२५ आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत इत्यादी बाबतचा तपशिल व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी www.nmc.gov.in या संकेत स्थळावर भेट देण्यात यावी. तसेच संवर्गनिहाय भरावयाची पदे, पदांचा तपशिल, वेतनश्रेणी, वयोमर्यादा / वयोमर्यादा शिथिलता, निवड पद्धत, सर्व साधारण सूचना, अटी व शर्ती, शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबाबत तरतूदी, पदनिहाय ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा शुल्क, अर्ज भरणेबाबत मार्गदर्शक सूचना इत्यादी बाबतचा तपशिल www.nmc.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे